Worli Jambori Dahi Handi 2022 | वरळीत दहीहंडीवरून राजकारण तापलं, शिवसेनेकडून विरोधात पोस्टरबाजी
वरळी जांभोरी येथे भाजपने दहीहंडी करण्याचे ठरवल्यानंतर येथे शिवसेनेकडून पोस्टरबाजी करण्यात येत आहे. त्यावरून वरळीतील राजकारण तापणार अशीच शक्यता वर्तवली जात आहे.
देशभरात दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळत आहे. राज्यातही अनेक ठिकाणी लहान-मोठ्या प्रमाणात दहीहंडी फोडली जात आहे. कुठे मंदीरात तर कुठे मैदानात गोविंदा दहीहंडीचा सण सजरा करताना दिसत आहेत. मात्र अशा वेळी वरळी जांभोरी येथे दहीहंडीवरून आता राजकारण गरम होण्याची शक्यता आहे. तर यावरून पुन्हा एकदा भाजप शिवसेना समोरा-समोर ही येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वरळी जांभोरी येथे भाजपने दहीहंडी करण्याचे ठरवल्यानंतर येथे शिवसेनेकडून पोस्टरबाजी करण्यात येत आहे. त्यावरून वरळीतील राजकारण तापणार अशीच शक्यता वर्तवली जात आहे.
Published on: Aug 19, 2022 01:43 PM
Follow Us
Latest Videos
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
