लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली; लाखो महिलांन होणार फायदा!

लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली; लाखो महिलांन होणार फायदा!

| Updated on: Jul 26, 2026 | 4:53 PM

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी मोठी दिलासादायक माहिती दिली आहे. ई-केवायसी पूर्ण न झालेल्या महिलांना आता घाई करण्याची गरज नसून सरकारने त्यासाठी 6 महिन्यांची मुदत दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेबाबत विविध चर्चा सुरू होत्या. विशेषतः ई-केवायसी न झाल्यामुळे अनेक महिलांना योजनेचा लाभ मिळणार का, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र अदिती तटकरे यांनी हा संभ्रम दूर केला आहे.

त्यांच्या माहितीनुसार, ज्या महिलांनी ई-केवायसीची प्रक्रिया सुरू केली आहे, पण काही त्रुटी राहिल्या आहेत, त्यांनाही त्या दुरुस्त करण्याची संधी दिली जाणार आहे. त्यामुळे पात्र महिलांना योजनेपासून वंचित राहावे लागणार नाही.

योजनेचा हप्ता वाढवण्याच्या मागणीबाबत बोलताना अदिती तटकरे म्हणाल्या की, यासंदर्भातील अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील. सध्या सरकार योजना प्रभावीपणे राबवण्यावर भर देत आहे.

दिल्लीतील आंदोलनाबाबत प्रतिक्रिया देताना त्यांनी लोकशाहीत नागरिकांना आपले मत मांडण्याचा अधिकार असल्याचे सांगितले. तसेच विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांवर सरकार सकारात्मक भूमिका घेऊन शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक पावले उचलत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Published on: Jul 26, 2026 4:53 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us