Ladki Bahin Yojana : अक्षय्य तृतीयेलाही हफ्ता नाही, लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचे पैसे कधी मिळणार? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं…

Ladki Bahin Yojana : अक्षय्य तृतीयेलाही हफ्ता नाही, लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचे पैसे कधी मिळणार? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं…

Harshada Shinkar | Updated on: May 01, 2025 | 4:14 PM

आज महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल कार्यक्रमादरम्या अदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींच्या एप्रिल महिन्यांच्या हफ्त्यासंदर्भात भाष्य केल्याचे पाहायला मिळाले.

‘लाडकी बहीण योजना महायुती सरकारची महत्वकांक्षी योजना आहे. एप्रिल महिन्याच हप्ता हा माता-भगिनी आणि लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच वितरित होणार आहे’, असं वक्तव्य करत महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हफ्त्यासंदर्भात मोठी अपडेट दिली आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय्य तृतीयेचा सण कालच साजरा करण्यात आला. याच अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिल महिन्याचे पैसे मिळणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र अक्षय्य तृतीयेलाही एप्रिल महिन्याचा हफ्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावर आलेला नाही, त्यामुळे लाडक्या बहिणींची निराशा झाली आहे. अशातच आज मंत्री अदिती तटकरे यांनी बोलताना एप्रिल महिन्याचा हफ्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकर जमा होणार असं सांगितलं. पण नेमका कधी खात्यात जमा होणार हे सांगितलं नसल्याने लाडक्या बहिणींना वाट पाहावी लागणार हेच त्यांच्या वक्तव्यावरून दिसतंय.

Published on: May 01, 2025 4:13 PM
Follow Us