Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची गळती सुरूच; मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
Ladki Bahin Yojana News Updates : लाडकी बहीण योजने अंतर्गत मंत्री अदिती तटकरे यांच्या जिल्ह्यातल्या तब्बल 15 हजार महिला या योजनेत अपात्र ठरलेल्या आहेत.
लाडकी बहीण योजनेच्या नियमांची पडताळणी आता केली जात असून पात्र बहिणींनाच या योजनेचा लाभ मिळणार असल्याचं मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलं आहे. त्यानंतर आता मंत्री अदिती तटकरे यांच्या जिल्ह्यात तब्बल 15 हजार लाडक्या बहिणी योजनेसाठी अपात्र ठरल्या आहेत. कागदपत्रांच्या त्रुटीमुळे हे अर्ज बाद झाले आहेत. तर रायगड जिल्ह्यातील 61 महिलांनी स्वत:हून अर्ज मागे घेतले आहेत. जिल्हा माहिती कार्यालयाने ही माहिती दिली आहे.
एकीकडे लाडक्या बहिणींना 2100 रुपयांची प्रतीक्षा आहे. तर दुसरीकडे छाननी करताना मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणींची संख्या कमी होत असल्याचं बघायला मिळत आहे.
Published on: Mar 25, 2025 07:22 PM
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

