Pune News : बिबट्याने 11 महिन्यांच्या चिमूकल्याला उचलून नेलं, 18 तासांनंतर सापडला मृतदेह
Dahitane leopard attack : दौंड तालुक्यातील दहिटणे येथे एका 11 महिन्यांच्या चिमुकल्या बाळाला उचलून नेलं आहे. यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
पुण्यातील दौंड तालुक्यातील दहिटणे या गावामध्ये येथे एका 11 महिन्याच्या बाळाला बिबट्याने उचलून नेलं आहे. तब्बल 18 तासांनी या बाळाचा मृतदेह सापडला आहे. वनविभाग, स्थानिक नागरिक आणि पोलिसांकडून या बाळाचा शोध घेतला जात होता. त्यांनंतर 18 तासांनी या चिमूकल्याचा मृतदेह सापडला आहे. काल पहाटे सुमारे साडेपाच वाजता या 11 महिन्यांच्या चिमूकल्याला बिबट्याने उचलून नेलं होतं. तेव्हापासून ऊसाच्या शेतात या चिमूकल्याचा शोध वनविभागाकडून घेतला जात होता. या घटनेमुळे परिसरात एकच भीतीच वातावरण पसरलं आहे.
Published on: May 01, 2025 02:15 PM
Latest Videos
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप

