अंदाज अपना अपना…2 संस्था 2 वेगवेगळे सर्व्हे, कोणत्या सर्वेक्षणात कुणाला धक्का? मविआ की महायुती?
महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात दोन संस्थांचे सर्व्हे समोर आले आहेत. दोनही सर्व्हे हे दोन वेगवेगळ्या संस्थांनी केलेत. यापैकी एका सर्व्हेत महायुतीला तर दुसऱ्या सर्व्हेत महाविकास आघाडीला धक्का बसण्याचा अंदाज वर्तवला गेलाय
मुंबई, ९ फेब्रुवारी २०२४ : महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात दोन संस्थांचे सर्व्हे समोर आले आहेत. दोनही सर्व्हे हे दोन वेगवेगळ्या संस्थांनी केलेत. यापैकी एका सर्व्हेत महायुतीला तर दुसऱ्या सर्व्हेत महाविकास आघाडीला धक्का बसण्याचा अंदाज वर्तवला गेलाय. जसजशा निवडणुका जवळ येताय तसतसे त्याबाबतचे सर्व्हे आणि त्याचे आकडे चर्चेत आहेत. टाईम्स नाऊच्या सर्व्हेनुसार, महाराष्ट्रात लोकसभेला महायुती वरचढ ठरवण्याचं भाकित ठरवलं गेलंय. मात्र नुकताच आलेला इंडिया टुडे सी व्होटरच्या सर्व्हेनुसार, भाजपला धक्का बसणार असून महाविकास आघाडीचा फायदा होताना दिसतोय. सध्यस्थितीत महायुतीला ३९ तर मविआला ०९ जागा मिळण्याचा अंदाज वर्तविला जातोय. तर इंडिया टुडेच्या सी व्होटरच्या सर्व्हेनुसार, महायुतीला २२ तर महाविकास आघाडीला २६ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. बघा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट…