Indian Army Press : या पुढची लढाई झाली तर.. ; भारतीय लष्कराच्या पत्रकार परिषदेतून सैन्य दलांचा थेट इशारा
Indian Army Press Conference Video : आज भारतीय लष्कराकडून ऑपरेशन सिंदूरबद्दल माहिती देण्यासाठी तिन्ही सैन्यदलाची संयुक्तिक पत्रकार परिषद घेण्यात आली.
पाकिस्तानचा वारही बॉर्डरच्या त्या पलिकडून होईल हे माहीत होतं. त्यामुळे आम्ही एअर डिफेन्सची तयारी आधीच केली होती, असं लेफ्टनंट जनरल राजीव घई पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले. आज भारतीय लष्कराकडून ऑपरेशन सिंदूरबद्दल माहिती देण्यासाठी तिन्ही सैन्यदलाची संयुक्तिक पत्रकार परिषद घेण्यात आली.
पुढे बोलताना राजीव घई यांनी सांगितलं की, आम्ही काऊंटर मॅन, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर साधन आणि सर्व प्रकारच्या सिस्टिमचं मिश्रण केलं. त्यामुळे पाकिस्तान एअरफोर्सने ९ आणि १० मे रोजी सातत्याने जे हल्ले केले, ते या मजबूत एअर डिफेन्स समोर अपयशी ठरले. आंतरराष्ट्रीय बॉन्ड्रीवरून रडार आणि अनेक गोष्टी येत होत्या. या पुढची लढाई झाली तर वेगळी असेल. मागच्या लढाई सारखी नसेल. कारण टेक्नॉलॉजी खूप प्रगत होत आहे. देव करो पण लढाई होऊ नये. मात्र, कोणत्याही प्रसंगासाठी आम्ही तयार आहोत. आम्ही तोंड द्यायला मजबूत आहोत.