Air Marshel A.K. Bharati : पाकिस्तानात झालेल्या नुकसानासाठी ते स्वत:च जबाबदार – एअर मार्शल ए. के. भारती
Indian Army Press Conference : भारतीय लष्कराकडून ऑपरेशन सिंदूरविषयी तिन्ही सैन्यदलाची संयुक्तिक पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी पाकिस्तानच्या कुरापाती भारतीय सैन्याकडून सांगण्यात आल्या.
पाकिस्तानमध्ये जे काही नुकसान झाले त्या सगळ्याला पाकिस्तानचं लष्कर स्वत: जबाबदार आहे. आमची लढाई दहशतवादाच्या विरोधात होती. आम्ही जो हल्ला केला तो फक्त दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर होता, असं एअर मार्शल ए. के. भारती यांनी म्हंटलं आहे. आज भारतीय लष्कराकडून तिन्ही सैन्यदलाची संयुक्तिक पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यात ते बोलत होते.
पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, पाकिस्तानने दहशतवाद्यांना साथ दिली. 7 तारखेला केलेला हल्ला हा फक्त दहशतवादी तळांवर होता. पाकिस्तानच्या लष्कराने दहशदवाद्यांना साथ देणं योग्य समजलं आणि या लढाईला आपली लढाई बनवून घेतलं. त्यांना प्रत्युत्तर देणं गरजेचं होतं. त्यामुळे यात त्यांचं जे काही नुकसान झालं त्याला स्वत: पाकिस्तानी लष्कर जबाबदार आहे. आपल्या ऐअर डिफेन्स सिस्टीम देशाच्यापुढे ढाल बनून उभ्या राहिल्या. याला भेदणं शत्रूला अशक्य आहे, असंही यावेळी ए. के. भारती म्हणाले.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

