India Pakistan News : भारत – पाकिस्तानमधल्या डिजीएमओंच्या चर्चेला सुरुवात
DGMO Meeting on India - Pakistan Conflict : भारत आणि पाकिस्तानच्या डिजीएमओंची आता एकमेकांशी चर्चा सुरू झाली आहे. कोणकोणते मुद्दे यावेळी चर्चेत पुढे येतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
भारत आणि पाकिस्तानच्या डिजीएमओंची आता एकमेकांशी चर्चा सुरू झाली आहे. ऑपरेशन सिंदूर आणि भारत – पाकिस्तानमधल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांचे डिजीएमओ एकमेकांशी चर्चा करणार आहेत. या चर्चे आधी भारताच्या डिजीएमओंची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह महत्वाची बैठक देखील झालेली आहे. त्यानंतर आता या चर्चेला सुरुवात झालेली आहे. या चर्चेत काही महत्वाचे मुद्दे मांडण्यात येणार आहेत. यात दहशतवादाचा मुद्दा हा मुख्य असणार आहे. तसंच सिंधु जल करार स्थगिती आणि पीओके संदर्भात देखील यावेळी चर्चा होऊ शकते असं सूत्रांनी सांगितलं आहे.
दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना देखील वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होण्याची आशा आहे. भारतासोबत असलेले इतर प्रश्न देखील या चर्चेने सुटतील असं शाहबाज शरीफ यांचं म्हणण आहे.

पुण्यात दादांचं भाषण सुरू अन् 'प्रहार'च्या कार्यकर्त्यानी घातला गदारोळ

पुढील 24 तास धोक्याचे... या जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, IMDचा अलर्ट काय?

16 तारखेपासून अन्नत्यागच नाहीतर तर आता... बच्चू कडूंची मोठी घोषणा काय?

मी काय येडगावहून आलोय? नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर भुजबळ भडकले
