MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 25 September 2021

राज्यात आज आणि उद्या (शनिवार आणि रविवार ता. 25 आणि 26 सप्टें) आरोग्य विभागाच्या गट क व गट ड पदाची परीक्षा (Maharashtra Health Department Exam) घेतली जाणार होती. मात्र ही परीक्षा राज्यात होत असताना काही विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटावर परीक्षा केंद्र ही इतर राज्यांतील आली आहेत

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 25 September 2021
| Updated on: Sep 25, 2021 | 8:12 AM

आरोग्य विभागाची उद्या आणि परवा होणारी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतलाय. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिलीय. या बातमीनंतर विद्यार्थ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. अनेक विद्यार्थ्यांच्या परीक्षा या परजिल्ह्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेकजण खबरदारी म्हणून आधीच परीक्षा केंद्रावर पोहोचले आहेत. तर काही विद्यार्थी अजूनही प्रवासात आहेत. शासनाने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक विद्यार्थी संताप व्यक्त करतायत. परीक्षा ऐनवेळी रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाबद्दल मी माफी मागतो, अशी प्रतिक्रिया आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यात आज आणि उद्या (शनिवार आणि रविवार ता. 25 आणि 26 सप्टें) आरोग्य विभागाच्या गट क व गट ड पदाची परीक्षा (Maharashtra Health Department Exam) घेतली जाणार होती. मात्र ही परीक्षा राज्यात होत असताना काही विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटावर परीक्षा केंद्र ही इतर राज्यांतील आली आहेत. “एका विद्यार्थ्याचे परीक्षा केंद्र उत्तर प्रदेशातील नोएडा येथे आलं आहे. त्यामुळे उद्याच्या परीक्षेबाबत परीक्षार्थींमध्ये एकच गोंधळ उडाला होता. ही समस्या केवळ एकाच विद्यार्थ्याला आली असून त्याचे हॉल तिकीट तात्काळ दुरुस्त केलं आहे”, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले होते. कुठल्याही परिक्षार्थींची गैरसोय होणार नाही अशा प्रकारे नियोजन करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र, त्यानंतरही परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलण्यात आल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

Follow us
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.