MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 28 June 2021
महाराष्ट्रात अनलॉक केल्यानंतर काही शहरांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा हळूहळू वाढू लागली आहे. याशिवाय कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंट्सचा धोकादेखील वाढताना दिसत आहे.
महाराष्ट्रात अनलॉक केल्यानंतर काही शहरांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा हळूहळू वाढू लागली आहे. याशिवाय कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंट्सचा धोकादेखील वाढताना दिसत आहे. त्यामुळे प्रशासन आणि सरकार पुन्हा एकदा बॅकफूटवर आलं आहे. त्यामुळे सोमवारपासून (28 जून) नवी मुंबईत नवीन निर्बंध लागू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सोमवारपासून नवी मुंबईत स्टेज 3 नुसार नवीन आदेश जारी करण्यात आले आहेत. राज्य शासनाने राज्यात निर्बंध लागू केल्यानंतर नवी मुंबईतही स्टेज 3 नूसार कोव्हिड प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत उद्यापासून (28 जून) निर्बंध लागू करण्यात आले आहेत. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी याबाबत लेखी आदेश आज जारी केले आहेत.

