MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 5.30 PM | 4 November 2021
राज्य सरकारनं महागाई भत्ता आणि घरभाडे भत्ता वाढवण्याची मागणी मान्य केली असली तर एसटीच्या सरकारमधील विलिनीकरणाबाबत अद्याप निर्णय होऊ शकलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचारी अद्यापही संपावर ठाम असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अशावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं एसटी कर्मचाऱ्यांना आपला पाठिंबा जाहीर केलाय. त्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहून सूचक इशारा दिलाय.
एसटीचे सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या प्रमुख मागणीसाठी राज्यात एसटी कर्मचाऱ्याचा बेमुदत संप सुरु आहे. राज्य सरकारनं महागाई भत्ता आणि घरभाडे भत्ता वाढवण्याची मागणी मान्य केली असली तर एसटीच्या सरकारमधील विलिनीकरणाबाबत अद्याप निर्णय होऊ शकलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचारी अद्यापही संपावर ठाम असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अशावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं एसटी कर्मचाऱ्यांना आपला पाठिंबा जाहीर केलाय. त्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहून सूचक इशारा दिलाय.
एसटी कर्मचाऱ्यांना सातत्याने विलंबाने मिळणारे वेतन, आर्थिक समस्यांमुळे कर्मचाऱ्यांनी केलेल्या आत्महत्या आणि महामंडळाच्या गैरकारभारामुळे कर्मचाऱ्यांच्या मनात निर्माण झालेला अविश्वास या गोष्टीमुळे एसटी कर्मचाऱ्यांमधील असंतोषाचा भडका उडाला आहे. आज गरज आहे ती एसटी कर्मचाऱ्यांच्या गरजा आणि भावना समजून घेण्याची. एसटी कर्मचारी, कामगार जगला तरच एसटी जगेल, हे भान बाळगण्याची. माझी आपणाला आग्रहाची विनंती आहे की, एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी उपोषण किंवा आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्ती वा अन्य कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये. अन्यथा, कर्मचारी-कामगारांमधील असंतोषाचा उद्रेक होईल, असं राज ठाकरे यांनी पत्रात नमूद केलं आहे.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज

