MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 18 August 2022 -TV9

आज दुसऱ्या दिवशी विरोधक सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न आणि आमदारांच्या वक्तव्यावरून घेरतील. मात्र मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना जसाच तसे उत्तर द्या अशा सूचना आमदारांच्या झालेल्या बैठकीत दिल्याचे समोर येत आहे.

अस्लम अब्दुल शानेदिवाण

|

Aug 18, 2022 | 9:40 AM

मुंबई : राज्यातील सत्ता पालटानंतर पहिल्यांदाच सुरू झालेल्या अधिवेशनात पहिल्या दिवशी विरोधकांनी आपली धार दाखवून दिली. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस असून ती धार कायम राहणार का? विरोधक आजही सत्ताधाऱ्यांना घेरणार का हे पहावं लागेल. तर महाविकास आघाडी सरकारच्या काळात असणाऱ्या मंत्र्यांच्याकडील पीए पीएसचे रेकॉर्ड आता तपासले जाणार. आज दुसऱ्या दिवशी विरोधक सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न आणि आमदारांच्या वक्तव्यावरून घेरतील. मात्र मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना जसाच तसे उत्तर द्या अशा सूचना आमदारांच्या झालेल्या बैठकीत दिल्याचे समोर येत आहे. तर मुख्यमंत्र्यांनी संतोष बांगर यांना समज दिली आहे. काही दिवसापूर्वी संतोष बांगर यांनी एका अधिकाऱ्यावर हात उगारला होता. यावरूनच विरोधकांनी संतोष बांगर आणि सत्ताधारी सत्ताधाऱ्यांवर टीकेची जोड उडवली होती

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें