आम्ही सुरत-गुवाहटी-गोवा गेलो नाही! भर भाषणात तटकरेंचं मोठं विधान
सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देवेंद्र फडणवीस आणि एनडीए सोबत ठामपणे उभा असल्याचे सांगितले. "आम्ही कधी सुरत-गुवाहाटी-गोवा असे गेलो नाहीत, आम्ही विकासासाठी गेलो," असे वक्तव्य त्यांनी केले. भास्कर जाधव यांनी भाजपवर मुंबई पालिकेसाठी टीका केली, तर परिणय फुके यांनी कार्यकर्त्यांना मत खाणाऱ्यांविरोद्धात सतर्क केले.
महाराष्ट्र राजकारणात विविध नेत्यांची वक्तव्ये आणि आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जाहीर केले की, त्यांचा पक्ष ३ तारखेनंतरही देवेंद्र फडणवीस आणि एनडीएच्या पाठीशी ठामपणे उभा राहील. “आम्ही कधी सुरत, गुवाहाटी, गोवा असे गेलो नाहीत. आम्ही जे गेलो ते विकासासाठीच,” असे म्हणत त्यांनी राजकीय पक्षांतरांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. याच प्रचार सभेतून, ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली.
भाजपचा आत्मा मुंबई महापालिकेत अडकला असून, त्यांना देशाची सत्ता मिळाली असली तरी त्यांचे लक्ष मुंबई निवडणुकीवरच असल्याचे जाधव म्हणाले. दुसरीकडे, भाजप नेते परिणय फुके यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले की, काही लोक निवडणुकीत मत खाण्यासाठी उतरले आहेत, ज्यामुळे भाजपला पराभूत करण्याचा त्यांचा डाव आहे. कार्यकर्त्यांनी कमळ जिंकून आणण्याची जबाबदारी घ्यावी, असेही ते म्हणाले.

