सोसाट्याचा वारा अन् पावसाच्या सरी, मुंबईतील ‘या’ भागात रिमझिम; पाहा व्हीडिओ…
Mumbai Rain Update : मुंबईत आज सकाळपासूनच काही भागात पाऊस सुरू झाला आहे. पूर्व उपनगरात चेंबूर, मुलूंड , कुर्ला तर पश्चिम उपनगरात बांद्रा , सांताक्रुझ , बोरिवली, दहिसर या परिसरात सकाळपासूनच अवकाळी पाऊस सुरू आहे. पाहा व्हीडिओ...
मुंबई : मुंबईत आज सकाळपासूनच काही भागात पाऊस सुरू झाला आहे. पूर्व उपनगरात चेंबूर, मुलूंड , कुर्ला तर पश्चिम उपनगरात बांद्रा , सांताक्रुझ , बोरिवली, दहिसर या परिसरात सकाळपासूनच अवकाळी पाऊस सुरू आहे. वाऱ्याचा वेगही वाढला आहे. ठाणे जिल्ह्यातही बदलापूर, अंबरनाथ भागात पहाटेपासून पाऊस सुरू आहे. अवकाळी पावसामुळे ऑफिसला जाणा-यांची तारांबळ उडाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत ढगाळ हवामान आहे. मात्र आज सकाळपासून काही भागात पाऊस सुरू आहे. दादर-परळ परिसरात ढगाळ हवामान आहे. मुख्य म्हणजे महाराष्ट्रात सुरु असणाऱ्या अवकाळी पावसाचे पडसाद या शहरावरही दिसून येऊ लागले आहेत. हवामान अभ्यासकांच्या मते मुंबईत झालेला हा पाऊस कोरड्या आणि दमट वाऱ्यांच्या एकत्र येण्यामुळं झाला आहे. पुढील तीन ते चार दिवस मुंबईत वातावरणात कोणतेही बदल नोंदवण्यात येणार नाहीत. मागील काही दिवसांत राज्यात वाढणारं तापमान पाहता त्यामुळं बाष्पीभवनाची प्रक्रिया होऊन राज्यातीस बहुतांश भागांमध्ये पावसाची रिपरिप पाहायला मिळत आहे.
Published on: Mar 16, 2023 09:38 AM
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...

