औरंगाबादमध्ये महिलेची छेड काढणाऱ्या मद्यधुंद रिक्षाचालकाला चोप

महिला प्रवासी एकटी असल्याचं पाहून चालक आपली रिक्षा सुसाट वेगाने पळवत होता. मात्र महिलेने हिंमत दाखवत भर रस्त्यात रिक्षा चालकाला चांगलाच चोप दिला. महिलेने आपल्या पायातील चपला काढून रिक्षा चालकावर उगारलीही होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

औरंगाबाद : रिक्षा चालकाने अल्पवयीन मुलीची छेड काढल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा औरंगाबादेत आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मद्यधुंद अवस्थेत असताना रिक्षा चालकाने महिलेची छेड काढल्याचा आरोप केला जात आहे. प्रवासी महिलेशी रिक्षा चालकाने अश्लील वर्तन केल्याचं उघडकीस आलं आहे. महिला प्रवासी एकटी असल्याचं पाहून चालक आपली रिक्षा सुसाट वेगाने पळवत होता. मात्र महिलेने हिंमत दाखवत भर रस्त्यात रिक्षा चालकाला चांगलाच चोप दिला. महिलेने आपल्या पायातील चपला काढून रिक्षा चालकावर उगारलीही होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रिक्षा चालकाच्या कृत्यामुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. तर महिलेने दाखवलेल्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे. छेड काढणाऱ्या रिक्षा चालकाची महिलेने चांगलीच धुलाई केली. परंतु नागरिकांचा जमाव जमताच रिक्षा चालकाने पळ काढल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI