AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur | पत्नीचे हात-पाय बांधून शारीरीक संबंधांची पतीची बळजबरी

Nagpur | पत्नीचे हात-पाय बांधून शारीरीक संबंधांची पतीची बळजबरी

| Updated on: Feb 22, 2022 | 1:11 PM
Share

पत्नीची इच्छा नसताना हात-पाय बांधून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवणे, हे क्रौर्यच आहे, असा निर्वाळा नागपुरातील कोर्टाने (Nagpur Court) दिला आहे.

पत्नीची इच्छा नसताना हात-पाय बांधून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवणे, हे क्रौर्यच आहे, असा निर्वाळा नागपुरातील कोर्टाने (Nagpur Court) दिला आहे. विवाहितेच्या घटस्फोट (Divorce) अर्जाला न्यायालयाने संमती दिली. 22 वर्षीय विवाहितेने घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज दाखल केला होता. पतीला दारुचे व्यसन असून सेक्स करण्यास नकार दिल्यावर तो बळजबरी करायचा, असा आरोप पीडितेने केला होता. हात-पाय बांधून नवरा आपल्याला शारीरिक संबंध (Physical Assault) ठेवायला भाग पाडायचा, तसेच आरडाओरडा करु नये, म्हणून तोंडात कापडाचा बोळाही कोंबायचा, असा दावा पीडित तरुणीने अर्जात केला होता. त्यानंतर विवाहितेच्या घटस्फोट अर्जाला संमती देत न्यायालयाने तिला दिलासा दिला आहे.