Aditya Thackeray | आदित्य ठाकरे आज चिपळूण दौऱ्यावर, नितीन राऊतही पाहणी करणार

ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे आज पूरग्रस्त कोकण दौऱ्यावर (Konkan Rain) जात आहेत. दोघेही रत्नागिरीतील चिपळूणमध्ये (Chiplun Rain) जाऊन पाहणी करणार आहेत. आदित्य ठाकरे हे नितीन राऊत यांना पनवेलमध्ये भेटतील. तिथून दोन्ही नेते चिपळूणला रवाना होत आहेत.

लोकांच्या घरापर्यंत वीज कशी द्यावी, मदत कशी पोहोचवावी यासाठी हा दौरा आहे. लोकांची सेवा करणे, ब्लॅंकेट, खाण्याच्या गोष्टी पुरवणे आणि सोलर लाईट देण्याचा कार्यक्रम आहे. बऱ्याच गोष्टी 80 टक्के पूर्ण केल्या आहेत, 20 टक्के बाकी आहेत. कर्मचाऱ्यांना बरीच तारेवरची कसरत करावी लागली. आज कोकणात जाऊन पाहणी करणार आहे. आदित्य ठाकरे सुद्धा असतील असा निरोप मिळाला आहे, असं नितीन राऊत यांनी सांगितलं.

नितीन राऊत या दौऱ्यात वीज यंत्रणेच्या दुरुस्तीचा आढावा घेणार आहेत. अतिवृष्टीमुळे महावितरण आणि महापारेषणच्या कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील वीज यंत्रणेचे अतोनात नुकसान झाले आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI