Mahayuti Press | महायुतीचे 17 अधिकृत उमेदवार कोण? नावे जाहीर, बंडखोरांना सक्त इशारा काय?

Mahayuti Press | महायुतीचे 17 अधिकृत उमेदवार कोण? नावे जाहीर, बंडखोरांना सक्त इशारा काय?

| Updated on: Jun 03, 2026 | 1:23 PM

राज्यात विधानपरिषदेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. येत्या 18 जून रोजी होणाऱ्या मतदानासाठी सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार तयारी सुरू असून निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुंबईत महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत भाजप नेते आणि कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली तसेच निवडणुकीतील रणनीती स्पष्ट केली.

राज्यात विधानपरिषदेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. येत्या 18 जून रोजी होणाऱ्या मतदानासाठी सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार तयारी सुरू असून निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुंबईत महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत भाजप नेते आणि कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली तसेच निवडणुकीतील रणनीती स्पष्ट केली. महायुतीतील सर्व घटक पक्षांमध्ये समन्वय असून ही निवडणूक आम्ही पूर्ण ताकदीने लढवत आहोत, असा विश्वास रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. 18 जून रोजी होणाऱ्या मतदानात राज्यातील सर्व 17 जागांवर महायुतीचे उमेदवार मोठ्या बहुमताने विजयी होतील, असा ठाम दावा त्यांनी केला.

निवडणूक जाहीर झाल्यापासून काही मतदारसंघांमध्ये बंडखोरीचे आव्हान समोर आले होते. मात्र वरिष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीमुळे आतापर्यंत तीन प्रमुख ठिकाणची बंडखोरी शांत करण्यात यश आले असल्याचे त्यांनी सांगितले. 4 जून हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने, बंडखोर किंवा अपक्ष म्हणून अर्ज केलेल्या नेत्यांनी पक्षाशी चर्चा करून माघार घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच पक्षाचा आदेश मानणाऱ्यांच्या राजकीय पुनर्वसनाचा विचार भविष्यात शासकीय समित्या आणि महामंडळांमध्ये केला जाईल, असेही संकेत त्यांनी दिले.

या पत्रकार परिषदेत महायुतीच्या जिल्हानिहाय अधिकृत उमेदवारांची यादीही जाहीर करण्यात आली. त्यानुसार विविध जिल्ह्यांमधून उमेदवारांची निवड करण्यात आली असून महायुतीने सर्व 17 जागांवर विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. महायुतीच्या नेत्यांनी विरोधकांवर टीका करताना, मविआकडे ना पुरेसे संख्याबळ आहे ना ठोस रणनीती, असा दावा केला. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील बहुतांश माजी लोकप्रतिनिधी महायुतीच्या संपर्कात असल्याने ही निवडणूक केवळ औपचारिकता ठरेल आणि सर्व जागांवर महायुतीचा विजय निश्चित असल्याचे नेत्यांनी स्पष्ट केले. सध्या राज्यातील राजकीय घडामोडींमुळे वातावरण कमालीचे तापले असून सर्वांचे लक्ष आता 4 जूनच्या डेडलाईनकडे आणि त्यानंतर 18 जून रोजी होणाऱ्या मतदानाकडे लागले आहे.

महायुतीची जिल्हानिहाय अधिकृत उमेदवार यादी:

१. नागपूर-  डॉ. राजीव भास्करराव पोतदार
२. भंडारा-गोंदिया-  श्री. अविनाश आनंदराव ब्राह्मणकर
३. वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली-  श्री. अरुण हनुमंत लखानी
४. अमरावती-  श्री. प्रविण रामचंद्र पोटे
५. सोलापूर-  श्री. राजेंद्र विठ्ठल राऊत
६. अहमदनगर-  श्री. प्राजक्त प्रसादराव तनपुरे
७. जळगाव-  श्री. नंदकिशोर भागवत महाजन
८. सांगली-सातारा-  श्री. धैर्यशील ज्ञानदेव कदम
९. नांदेड-  श्री. अमरनाथ अनंतराव राजूरकर
१०. उस्मानाबाद-लातूर-बीड-  श्री. बसवराज माधवराव पाटील
११. औरंगाबाद-जालना-  श्री. सुहास त्र्यंबकराव शिरसाठ
१२. ठाणे-  श्री. रविंद्र सदानंद फाटक
१३. यवतमाळ-  श्री. दुष्यंत सतीश चतुर्वेदी
१४. परभणी-हिंगोली-  सईद शेरगुल खान
१५. नाशिक-  श्री. नरेंद्र भिकाजी दराडे
१६. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग-  श्री. अनिकेत सुनिल तटकरे
१७. पुणे-  श्री. विक्रम संजय काकडे

 

Published on: Jun 03, 2026 1:23 PM
Follow Us