AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर

Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर

| Updated on: Oct 09, 2026 | 2:01 PM
Share

शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ही सुनावणी ३० ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली आहे. यामुळे ठाकरे गट की शिंदे गट, कुणाच्या बाजूने निकाल लागेल, याबाबतची उत्सुकता वाढली आहे.

शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीसंदर्भात एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ही सुनावणी ३० ऑक्टोबरपर्यंत संपण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये होणाऱ्या युक्तिवादाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोर्ट नेमकी काय भूमिका घेते आणि निकाल कुणाच्या बाजूने लागतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

३० ऑक्टोबरपर्यंत सुनावणी संपेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता आहे. ही केवळ शक्यता नसून, सर्वोच्च न्यायालयाने एका सुनावणीदरम्यान या प्रकरणाचा तोंडी उल्लेख केला आहे. पश्चिम बंगाल एसआयआरच्या सुनावणीदरम्यान वकिलांनी त्वरित सुनावणीची विनंती केली असता, सर्वोच्च न्यायालयाने ३० ऑक्टोबरपर्यंत शिवसेनेची सुनावणी संपवून नंतर बंगाल एसआयआर प्रकरण घेतले जाईल, असे स्पष्ट केले. यामुळे ३० ऑक्टोबरपर्यंत शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी संपवण्याचे कोर्टाने निश्चित केल्याचे समोर आले आहे.

या निर्णयानंतर दिल्लीत आणि महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडणार असल्याचे बोलले जात आहे. ठाकरे गट आणि शिंदे गट यापैकी कोणाच्या बाजूने निकाल लागतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

 

 

Published on: Oct 09, 2026 02:01 PM

Follow Us