Rain Update : राज्यभरात धुव्वाधार… तुमच्या जिल्ह्यात कसा होणार पाऊस? हवामान खात्यानं काय सांगितलं..
हवामान खात्याकडून नाशिकला देण्यात आलेला येलो अलर्ट कायम आहे. काल दिवसभरात 35 मिमी पावसाची नोंद झाली आहे. संध्याकाळच्या सुमारास जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळाली. आज विश्रांती नंतर पुन्हा पाऊस झाल्याचे पाहायला मिळाले. तर पुढचे दोन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याचा संततधार पावसाचा अंदाजही आहे.
राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने चांगलंच थैमान घातलं आहे. पालघर जिल्ह्याला हवामान खात्यानं रेड अलर्ट तर मुंबई आणि ठाण्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यासह रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट दिला आहे. काल संध्याकाळपासून मुंबई आणि मुंबई उपनगरात पावसाची हजेरी पाहायला मिळाली. दादर, सायन, माटुंगा, कुर्ला, कल्याण डोंबिवली, ठाणे येथे झालेल्या मुसळधार पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली असताना आज हवामान विभागाने मुंबई आणि मुंबई उपनगराला अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे.
दुसरीकडे रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार पाऊस होत आहे. राज्यातील रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा जिल्ह्यातील खाट विभागात पुढील 48 तासात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलंय.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

