AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2 महिन्यांनंतर शाळा सुरू! कुठे ढोल-ताशे, कुठे फुलांचा वर्षाव; विद्यार्थ्यांचं जंगी स्वागत

2 महिन्यांनंतर शाळा सुरू! कुठे ढोल-ताशे, कुठे फुलांचा वर्षाव; विद्यार्थ्यांचं जंगी स्वागत

| Updated on: Jun 15, 2026 | 12:13 PM
Share

उन्हाळ्याच्या तब्बल दोन महिन्यांच्या सुट्टीनंतर विदर्भ वगळता महाराष्ट्रातील इतर भागांतील शाळा आजपासून (15 जून) पुन्हा सुरू झाल्या आहेत. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्यभरातील शाळांमध्ये उत्साह, आनंद आणि चैतन्याचे वातावरण पाहायला मिळाले.

मुंबई, पुणे, सातारा, नाशिक, अहिल्यानगर, परळी, रत्नागिरी यांसह राज्यातील विविध भागांमध्ये विद्यार्थ्यांचे विशेष पद्धतीने स्वागत करण्यात आले. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे औक्षण करून, गुलाबाची फुले, पेढे आणि मिठाई देत त्यांचे स्वागत करण्यात आले.

सातारा जिल्ह्यात काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी अनोखे उपक्रम राबवण्यात आले. विविध वेशभूषेत आलेल्या विद्यार्थ्यांची ट्रॅक्टर-ट्रॉलीमधून मिरवणूक काढण्यात आली. तसेच ढोल-ताशांच्या गजरात शाळा आणि परिसर दुमदुमून गेला.

नाशिकमधील एका शाळेत विद्यार्थ्यांसाठी खास ‘जंगल थीम’ तयार करण्यात आली होती. आकर्षक सजावट, फुलांची आरास आणि विविध उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला.

मुंबई शहर आणि उपनगरांतील शाळांमध्येही विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी विशेष तयारी करण्यात आली होती. शिक्षकांनी गुलाबाची फुले, पेढे आणि शुभेच्छा देत विद्यार्थ्यांचे स्वागत केले. दीर्घ सुट्टीनंतर मित्र-मैत्रिणी आणि शिक्षकांना भेटल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसत होता.

दरम्यान, नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्यभरातील शाळांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले असून, विद्यार्थ्यांनी नव्या उमेद आणि उत्साहाने शिक्षणाच्या प्रवासाला सुरुवात केली आहे.

Published on: Jun 15, 2026 12:07 PM

Follow Us