AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vice President Election : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरून राजकीय घमासान, राऊतांचा फडणवीसांवर निशाणा; पक्ष फोडता अन्...

Vice President Election : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरून राजकीय घमासान, राऊतांचा फडणवीसांवर निशाणा; पक्ष फोडता अन्…

| Updated on: Aug 23, 2025 | 5:54 PM
Share

उपराष्ट्रपती पदांच्या निवडणुकीसाठी एनडीए आणि इंडिया आघाडी दोघांनीही ताकद लावली आहे. भाजपकडे संख्याबळ आहे, पण व्हीप नसल्याने क्रॉस वोटिंगची शक्यता अधिक आहे. त्यामुळे भाजप सावध आहे. मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना फोन करून राधाकृष्णन यांना पाठिंबा मागितलाय. तर पक्ष फोडूनही मतांसाठी फोन करता असा निषेधा राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर साधलाय.

इंडिया आघाडीने उमेदवार दिलेला असतानाही उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना फोन केला. पण शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन एनडीएचे उमेदवार राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्यास नकार देत इंडिया आघाडीचे बी सुदर्शन रेड्डींनाच मतदान करणार असल्याचे जाहीर केलं. एनडीएच्या सी पी राधाकृष्णन यांचा इंडिया आघाडीच्या बी सुदर्शन रेड्डीशी सामना आहे. मतांच्या आकडेवारीचा विचार केला तर एनडीएकडे बहुमत आहे. पण सुदर्शन रेड्डींचा आंध्र आणि तेलंगणाशी संबंध असल्याने प्रादेशिक अस्मिता म्हणून एनडीएमध्ये असले तरी चंद्रबाबू नायडू काय करतात हाही प्रश्न आहे. त्यासोबत जगनमोहन रेड्डींची वायएसआर काँग्रेस आणि तेलंगणामध्ये केसीआर यांची भूमिकाही महत्त्वाची असेल.

सध्या संसदेचे एकूण खासदार आहेत 782 आणि जिंकण्यासाठी 391 मतं हवी आहेत. भाजप आणि एनडीएकडे 422 खासदार आहेत म्हणजे बहुमतापेक्षा 31 अधिक आहेत. तर काँग्रेस आणि इंडिया आघाडीकडे 312 खासदार आहेत. रेड्डींच्या विजयासाठी 79 खासदारांची गरज आहे तर 48 खासदार तटस्थ आहेत. त्यामुळे आंध्र तेलंगणामध्ये 33 खासदार आहेत. त्यामुळे चंद्रबाबू नायडू जगनमोहन रेड्डी आणि केसीआर हे तिघेही निर्णायक भूमिकेत आहेत.

Published on: Aug 23, 2025 05:54 PM