MLA Santosh Bangar आणि MP Hemant Patil यांनी पुन्हा निवडूण दाखवावं, युवासैनिकाचं चॅलेंज – tv9
एका युवा सैनिकाने आमदार संतोष बांगर आणि खासदार हेमंत पाटील यांना थेट आवाहन देत तुम्ही पुन्हा निवडून येऊन दाखवा, मी आपली सगळी संपत्ती दान करतो असे म्हटलं आहे.
महाविकास आघाडीला धक्का देत एकनाथ शिंदे आपला शिंदे गट बनवला आणि शिवसेनेला खिंडार पाडले. यावेळी आमदार संतोष बांगर हे मातोश्रीच्या मागे उभे होते. मात्र शेवटच्या दिवशी असं काय झालं जे ते शिंदे गटात गेले, हे कोणालाच कळले नाही. त्यामुळे बांगर यांच्या मतदार संघातील कट्टर शिवसैनिक चांगलेच दुखावले आहेत. त्यातून एका युवा सैनिकाने आमदार संतोष बांगर आणि खासदार हेमंत पाटील यांना थेट आवाहन देत तुम्ही पुन्हा निवडून येऊन दाखवा, मी आपली सगळी संपत्ती दान करतो असे म्हटलं आहे. त्याचबरोबर जर हे दोघेही निवडूण आले तर माझ्याकडे पैसे नसले तरिही मतदार संघात फिरून एक एक रूपया गोळा करून एक लाख लिटर दुधाचा अभिषेक आपण मुख्यमंत्र्यांना घालू असेही युवासैनिक दिलीप घुगे यांनी म्हटलं आहे.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज

