Vidhan Parishad | विधान परिषदेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला! भाजपचा दबदबा कायम; शिंदे सेना-राष्ट्रवादीला किती जागा?

Vidhan Parishad | विधान परिषदेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला! भाजपचा दबदबा कायम; शिंदे सेना-राष्ट्रवादीला किती जागा?

| Updated on: May 25, 2026 | 12:04 PM

राज्यात विधान परिषद निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 25 मे ते 1 जून दरम्यान अर्ज दाखल करता येणार असून 2 जून रोजी अर्जांची छाननी होणार आहे.

राज्यात विधान परिषद निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 25 मे ते 1 जून दरम्यान अर्ज दाखल करता येणार असून 2 जून रोजी अर्जांची छाननी होणार आहे. तर 22 जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
दरम्यान, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागावाटपावरून मोठी रस्सीखेच पाहायला मिळाली. भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात अनेक बैठका, चर्चा आणि नाराजीच्या घडामोडी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.
अखेर दीर्घ चर्चेनंतर महायुतीत जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, विधान परिषद निवडणुकीत भाजप 12 जागांवर उमेदवार देणार असून शिंदे गटाच्या शिवसेनेला 4 जागा, तर राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागा देण्यात येणार आहे.
महायुतीतील जागावाटपाचा हा फॉर्म्युला निश्चित झाल्यानंतर आता इच्छुक उमेदवारांच्या हालचालींनाही वेग आला असून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापू लागलं आहे.

 

Published on: May 25, 2026 12:04 PM
Follow Us