Hasan Mushrif | अजित पवारांनंतर अर्थखात्याचा तिढा, हसन मुश्रीफांचा मोठा दावा; भाजप राष्ट्रवादीचा सन्मान राखणार का? चर्चांना उधाण
राज्यातील महायुती सरकारमध्ये अर्थखात्यावरून पुन्हा एकदा नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत मुंबईतील देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अर्थखातं पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे देण्याबाबत पूर्वी आश्वासन देण्यात आलं होतं, मात्र अद्याप निर्णय न झाल्याने काही आमदारांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यापूर्वी अर्थखातं दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे होतं. त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे खातं स्वतःकडे घेतलं. अधिवेशनानंतर काही दिवसांत अर्थखातं पुन्हा राष्ट्रवादीकडे सोपवलं जाईल, असं सांगण्यात आलं होतं. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही याबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नसल्याने बैठकीत नाराजीचा सूर उमटल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ यांनी माध्यमांशी बोलताना या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली. “अर्थखातं पूर्वी आमच्याकडे होतं. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर लगेच अर्थसंकल्प सादर होणार असल्यामुळे हे खातं नंतर राष्ट्रवादीला दिलं जाईल, असं सांगण्यात आलं होतं. काही आमदारांनी भावना व्यक्त केल्या असल्या तरी आज सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर गेल्या आहेत. त्यामुळे याबाबत सकारात्मक निर्णय होईल आणि भाजप निश्चितपणे आमचा सन्मान राखेल,” असा विश्वास हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
Published on: May 27, 2026 01:02 PM
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय