Vidhan Parishad Election | महायुतीत जागावाटपावरून महाभारत! मुख्यमंत्री फडणवीसांनीच सांगितलं कुठे कुठे तिढा?

Vidhan Parishad Election | महायुतीत जागावाटपावरून महाभारत! मुख्यमंत्री फडणवीसांनीच सांगितलं कुठे कुठे तिढा?

| Updated on: May 25, 2026 | 5:42 PM

राज्यात विधान परिषद निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील एकूण 17 जागांसाठी ही निवडणूक होणार असून महायुतीमध्ये जागावाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा आहे. प्रत्येक घटक पक्षाला जास्तीत जास्त जागा मिळाव्यात यासाठी पडद्यामागे मोठ्या बैठका आणि चर्चांचे सत्र सुरू आहे.दरम्यान, महायुतीतील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला समोर आला असून काही जागांवर अद्याप तिढा कायम असल्याची माहिती मिळत आहे.

राज्यात विधान परिषद निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील एकूण 17 जागांसाठी ही निवडणूक होणार असून महायुतीमध्ये जागावाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा आहे. प्रत्येक घटक पक्षाला जास्तीत जास्त जागा मिळाव्यात यासाठी पडद्यामागे मोठ्या बैठका आणि चर्चांचे सत्र सुरू आहे.दरम्यान, महायुतीतील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला समोर आला असून काही जागांवर अद्याप तिढा कायम असल्याची माहिती मिळत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप 12 जागांवर, शिंदे गटाची शिवसेना 4 जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेस 1 जागेवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. मात्र काही महत्त्वाच्या मतदारसंघांवरून अजूनही अंतिम निर्णय झालेला नाही.

हिंगोली-परभणी मतदारसंघ शिवसेनेकडे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळू शकते, अशी चर्चा आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे, कोकण आणि हिंगोली-परभणीच्या जागांवरही दावा केल्याची माहिती समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना काही जागांबाबत चर्चा सुरू असल्याचं स्पष्ट केलं. “नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरच्या जागांबाबत शिवसेनेसोबत चर्चा सुरू आहे. तसेच पुण्याच्या जागेबाबत राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरू आहे. आम्ही एकत्र बसून त्यावर मार्ग काढू. अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही,” असं फडणवीस यांनी सांगितलं.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यात आज किंवा उद्या महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता असून त्यानंतर जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

 

Published on: May 25, 2026 5:42 PM
Follow Us