Swargate Rape Case : स्वारगेट बस स्थानकात महिलांनी आणली तिरडी, आंदोलनातून आरोपीच्या फाशीची मागणी, बघा व्हिडीओ
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात महिला जागर समितीकडून आनोखं आंदोलन कऱण्यात आल्याचे पाहायला मिळाले. महिला जागर समितीकडून पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात तिरडी आंदोलन करण्यात आलंय
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात महिला जागर समितीकडून आनोखं आंदोलन कऱण्यात आल्याचे पाहायला मिळाले. महिला जागर समितीकडून पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात तिरडी आंदोलन करण्यात आलं असून या आंदोलनाच्या माध्यमातून महिलांवर होणाऱ्या अत्याचार प्रकरणाचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. तर गेल्या दोन दिवसांपूर्वी स्वारगेट बस स्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका तरूणीवर अत्याचार कऱणाऱ्या आरोपी दत्तात्रय गाडेला फाशीची शिक्षा द्या, अशी मागणीही या महिलांना आंदोलनाच्या माध्यमातून केली आहे. यासोबत राज्यगृहमंत्री योगेश कदम यांच्या वक्तव्याचाही या आंदोलनातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी महिलांकडून स्वारगेट बसस्थानकातील बलात्कार घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत असताना महिला आजही असुरक्षित असल्याच्या घोषणा देण्यात आल्यात.
दरम्यान, पुण्यात घडलेल्या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना रोखणं, हाणामारी, प्रतिकार काहीही घडलेलं नाही. अतिशय शांततेनं ती घटना घडली असं म्हणत तरुणींना आरडाओरडा का केला नाही असा प्रतिसवाल गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केला. तर योगेश कदम पुण्यामध्ये येऊन बलात्कार झालेल्या तरुणीवरून एक बेजबाबदार वक्तव्य केल्याचे म्हणत विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली. दरम्यान, आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं त्यांनी म्हटलंय.

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार

'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब

पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड

'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
