Malegaon Blast | मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा

| Updated on: Apr 22, 2026 | 2:27 PM

मुंबई उच्च न्यायालयाने आज (22 एप्रिल 2026) रोजी 2006 मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात महत्त्वाचा निर्णय दिला. न्यायालयाने राजेंद्र चौधरी, धन सिंग, मनोहर रामसिंग नारवरिया आणि लोकेश शर्मा या चार आरोपींना निर्दोष मुक्त केलं. यापूर्वी विशेष न्यायालयाने या चौघांवर आरोप निश्चित केले होते, मात्र उच्च न्यायालयाने तो आदेश रद्द करत सर्व आरोप फेटाळले.

हे प्रकरण 8 सप्टेंबर 2006 रोजी Malegaon येथे झालेल्या भीषण बॉम्बस्फोटांशी संबंधित आहे. हमिदिया मशीद आणि बडा कब्रस्तान परिसरात झालेल्या स्फोटांत 31 जणांचा मृत्यू झाला होता, तर 312 जण जखमी झाले होते.

न्यायमूर्तींच्या खंडपीठाने अपील मंजूर करत हा निकाल दिला. या निर्णयामुळे चारही आरोपींना मोठा दिलासा मिळाला असून, या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे.

Published on: Apr 22, 2026 02:27 PM
Follow Us