Baramati : माळेगाव साखर कारखान्यासाठी मतदान सुरू, अजितदादा चेअरमन होणार? कोण मारणार बाजी?
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे बळीराजा पॅनेल, चंद्रराव तावरे यांचे सहकार बचाव पॅनेल आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनेल यांचा समावेश आहे.
बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी आज मतदान होत आहे. बळीराजा पॅनल, सहकार बचाव पॅनल आणि निळकंठेश्वर पॅनल यांच्यात तगडी लढत होणार आहे. तर माळेगाव कारखान्याच्या चेअरमन पदासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतःच उमेदवार आहेत. तर चेअरमन पदासाठी अजित पवार यांना ८५ वर्षीय चंद्रराव तावरे यांचं माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत आव्हान असणार आहे. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक दिग्गजांनी मतदान केलंय तर शरद पवार हे मतदानाचा हक्क बजावलेला नाही. त्यामुळे ते मतदान करणार की नाही? याची उत्सुकता आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याची एकूण मतदारसंख्या १९,६५१ इतकी आहे. या निवडणुकीत तीन प्रमुख पॅनेलमध्ये लढत पार पडत आहे. बघा काय म्हणाले अजित पवार आणि सुप्रिया सुळे?

मोठा हॉल अन् पडदे टाकून बनवलेल्या वर्गखोल्या

ऊसतोड कामगार महिलांच्या गर्भपिशव्या काढल्याचा प्रश्न विधीमंडळात गाजला

गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटमध्ये उसळला भक्तांचा महासागर

शिक्षकांच्या आंदोलनाला यश, महाजनांची मोठी घोषणा; येत्या 8 दिवसांत...
