Mandira Bedi | प्रख्यात अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांचे निधन, हार्ट अटॅकनंतर अखेरचा श्वास

प्रख्यात अभिनेत्री मंदिरा बेदी (Mandira Bedi) हिच्या पतीचे निधन झाले. हृदयविकाराच्या धक्क्याने दिग्दर्शक राज कौशल (Raj Kaushal) यांची प्राणज्योत मालवली. मुंबईतील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

प्रख्यात अभिनेत्री मंदिरा बेदी (Mandira Bedi) हिच्या पतीचे निधन झाले. हृदयविकाराच्या धक्क्याने दिग्दर्शक राज कौशल (Raj Kaushal) यांची प्राणज्योत मालवली. मुंबईतील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  राज कौशल यांनी अभिनेता म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. कारकिर्दीत त्यांनी तीन चित्रपटांचे दिग्दर्शन केले. ‘प्यार में कभी कभी’, ‘शादी का लड्डू’ आणि ‘अँथनी कौन है’ यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन राज कौशल यांनी केले आहे. तर माय ब्रदर निखिल, शादी का लड्डू आणि प्यार में कभी-कभी या सिनेमांची निर्मितीही त्यांचीच होती. राज कौशल यांच्या निधनाने बॉलिवूडमधील दिग्गजांनीही शोक व्यक्त केला आहे.

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI