जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये गोळीबाराची घटना; स्थानिक आमदार मनिषा चौधरी बोरिवली रेल्वे स्थानकात दाखल!
जयपूर ते मुंबई पॅसेंजर ट्रेनमध्ये गोळीबार झाल्याची एक धक्कादायक घटना घडली आहे. सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार मनिषा चौधरी बोरिवली रेल्वे स्थानकात दाखल झाल्या.
मुंबई, 31 जुलै 2023 | जयपूर ते मुंबई पॅसेंजर ट्रेनमध्ये गोळीबार झाल्याची एक धक्कादायक घटना घडली आहे. सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जयपूर-मुंबई ही सुपरफास्ट पॅसेंजर एक्स्प्रेस मुंबई सेंट्रलकडे जात होती. तेव्हा गाडीत सुरक्षेच्या कारणास्तव कार्यरत असलेला आरपीएफ जवान चेतन याने एएसआय टिकाराम यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात टिकाराम यांच्यासह अन्य तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार मनिषा चौधरी बोरिवली रेल्वे स्थानकात दाखल झाल्या. जयपूर एक्सप्रेसमधील गोळीबाराच्या घटनेची माहिती घेणार असल्याचं यावेळी त्या म्हणाल्या.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

