राष्ट्रवादीचं विलिनीकरण?; सुप्रिया सुळेंनी उघड केली इनसाईड स्टोरी, म्हणाल्या…
राज्यात गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) सहभागी होणार असल्याच्या चर्चांना जोर आला होता. शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजप नेते विनोद तावडे यांच्यात झालेल्या कथित बैठकीमुळे या चर्चांना अधिक उधाण आले होते. त्याचबरोबर पक्षातील काही खासदार अस्वस्थ असल्याच्या दाव्यांमुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्क रंगले होते.

या सर्व चर्चांवर आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट भूमिका मांडत सर्व अफवांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी, “आमच्याशी कोणी बोलत नाही आणि आम्हीही कुणाशी बोलत नाही. भाजपसोबत जाण्याचा विषय आमच्या चर्चेतच नाही. या बातम्या फक्त वर्तमानपत्र आणि टीव्हीपुरत्याच मर्यादित आहेत,” असे स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी माध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चांवर भाष्य करत, “शरद पवार नेहमी सांगतात, चांगल्या-वाईट कोणत्याही कारणाने आपली चर्चा होत असेल, तर आपलं नाणं अजूनही खणखणीत आहे. गेली अनेक वर्षे माझ्या शपथविधीच्या बातम्याही सातत्याने येत आहेत,” असे सांगत या चर्चांकडे हलक्याफुलक्या शब्दांत पाहण्याचे संकेत दिले.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षातील काही खासदार अस्वस्थ असल्याचे केलेल्या वक्तव्यालाही सुप्रिया सुळे यांनी फेटाळले. “आमचे सर्व खासदार नियमित संपर्कात आहेत. आम्ही सातत्याने भेटतो, चर्चा करतो आणि पक्षात कोणतीही नाराजी नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांबाबतही सुप्रिया सुळे यांनी भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, “अजित पवार यांची सर्वांनी एकत्र यावे अशी इच्छा होती. त्या विषयावर पूर्वी चर्चा झाली होती. मात्र आता तो विषय संपला आहे. आम्ही आमच्या मार्गाने आणि ते त्यांच्या मार्गाने पुढे जात आहोत. सध्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत कोणतीही चर्चा सुरू नाही,” असे स्पष्ट करत विलीनीकरणाच्या चर्चांनाही पूर्णविराम दिला.
Published on: Jul 10, 2026 11:54 AM
खड्ड्यांनी घेतला आणखी एक बळी! रोहा उड्डाण पुलावर एकाचा जागीच मृत्यू
महाराष्ट्र ATSचा मोठा धडाका! राज्यभर अचानक छापे; 100 जण रडारवर?
राष्ट्रवादीचं विलिनीकरण?; सुप्रिया सुळेंनी उघड केली इनसाईड स्टोरी...
हो... कदरूपणा आहे! राऊतांचं शिंदेंना चोख प्रत्युत्तर; म्हणाले...