Manisha Kayande | विरोधक मागील 2 वर्षांपासून सरकार पाडण्यासाठी तारखा काढत आहेत- मनिषा कायंदे

विरोधक गेल्या दोन वर्षांपासून सरकार पाडण्याचे प्रयत्न करत आहेत, त्यासाठी दोन वर्षे झाली तारखा काढत आहेत, अशी टीका मनिषा कायंदे यांनी केली आहे.

नाशिक : विरोधक गेल्या दोन वर्षांपासून सरकार पाडण्याचे प्रयत्न करत आहेत, त्यासाठी दोन वर्षे झाली तारखा काढत आहेत, अशी टीका मनिषा कायंदे यांनी केली आहे. कोरोनाकाळात जग कोरोनाबाबत उपाययोजना करण्यात व्यस्त असतानाही विरोधकांना सरकार पाडायचं पडलं आहे, पण भाजपचे हे प्रयत्न फेल ठरले असल्याची टीका शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस दोन वर्षे झाले स्पप्न पाहत आहे, त्यांनी पाच वर्षे विरोधी पक्षनेते म्हणूनच काम करावं असंही कायंदे म्हणाल्या आहेत. त्यामुळे सरकारच्या दोन वर्षेपूर्तीनंतरही विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमधला शाब्दिक वाद काही के्लया संपत नाही.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI