उपोषणाच्या चौथ्या दिवशी मनोज जरांगेंचा मोठा निर्णय!
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेले उपोषण आज चौथ्या दिवशी आहे. आंदोलनाला प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी पाणी पिणेही बंद केले आहे.
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. 29 तारखेला मनोज जरांगे यांनी चलो मुंबईचा एल्गार केल्यानंतर त्यांनी मुंबईत दाखल होत आझाद मैदानात आंदोलन आणि उपोषण सुरू केलं आहे. त्यांच्यासह राज्यभरातून मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव मुंबईत दाखल झालेले आहेत. त्यामुळे मुंबईत भगवे वादळ सध्या बघायला मिळत आहे.
दरम्यान, आज उपोषणाच्या चौथ्या दिवशी जरांगे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. आंदोलनाची प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप मनोज जरांगे यांच्याकडून होत असतानाच आता आजपासून जरांगे यांनी आपले उपोषण अधिक कडक केले आहे. आज पासून जरांगे यांनी पाणी पिणे देखील सोडले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता यावर फडणवीस सरकारकडून काय भूमिका घेतली जाणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर

