मनोज जरांगे पाटलांविरोधातील वॉरंट रद्द, कोर्टाकडून 500 रूपयांचा दंड; काय आहे प्रकरण?
मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधातील वॉरंट पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाकडून रद्द करण्यात आले आहे. तर मनोज जरांगे पाटील यांना ५०० रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. २०१२ - २०१३ सालच्या एका प्रकरणात वॉरंट बाजवण्यात आलं होतं. या प्रकरणासंदर्भातच मनोज जरांगे पाटील हे पुणे कोर्टात हजर झाले होते.
मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना पुणे शिवाजीनगर न्यायालयाकडून दिलासा देण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधातील वॉरंट पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाकडून रद्द करण्यात आले आहे. तर मनोज जरांगे पाटील यांना ५०० रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मनोज जरांगे यांना २०१२ – २०१३ सालच्या एका प्रकरणात वॉरंट बाजवण्यात आलं होतं. या प्रकरणासंदर्भातच मनोज जरांगे पाटील हे पुणे कोर्टात हजर झाले होते. दरम्यान, न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांना २०१३ साली कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका फसवणुकीचा गुन्ह्यामध्ये वॉरंट बजावले होते. यासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, आज कोर्टात तारीख होती, कायदा सगळ्यांना समान आहे, न्यायाची प्रक्रिया सुरू आहे. कायद्याचा सन्मान करून आलो, न्यायालयासमोर गर्दी होऊ नये म्हणून माध्यमांना न सांगता आलो, असेही जरांगे पाटील यांनी म्हटले.
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..

