Manoj Jarange Patil : नादी लागलीस तर तुझं सगळं गबाळ उचकीन, जरांगे पाटलांचा चित्रा वाघ यांच्यावर हल्लाबोल
'आमच्या लहान लहान मुली, तीन-चार वर्षांच्या मुली पोलिसांच्या हल्ल्यात जखमी झाल्या, रक्ताच्या थारोळ्यात पडल्या तेव्हा तू झोपा काढत होतीस का? तेव्हा तुझी जात जागी झाली नाही का? तू कोणाच्याही नादी लाग, पण माझ्या नादी लागू नको. नाहीतर तुझे सगळे गबाळ बाहेर काढेन.'
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आईबद्दल मनोज जरांगे पाटील यांनी अपशब्द वापरल्याचा आरोप भाजपने केलाय. महाराष्ट्र मनोज जरांगे पाटलांना माफ करणार नाही, असं प्रवीण दरेकर यांनी म्हटले तर मुख्यमंत्र्यांवर टीका केल्यास जशास तसं उत्तर देऊ, असं परिणय फुकेंनी म्हटलं. दरम्यान फडणवीसांच्या आईंबद्दल मी बोललो नाही तसं असेल तर शब्द मागे घेतो, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. तर यासंदर्भात भाष्य करताना चित्रा वाघ यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. दरम्यान, चित्रा वाघ यांनी केलेल्या वक्तव्यावर मनोज जरांगे पाटलांनी चांगलाच जिव्हारी लागणारा पटलवार केलाय.
मनोज जरांगे पाटील यांनी खालच्या दर्जाचा आणि वैयक्तिकरित्या टीका करत वक्तव्य केलं तर याचं उत्तर देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता सक्षम आहे. निवडणुका संपल्या की ते परत झोपून जातात सुसंस्कृत महाराष्ट्र मनोज जरांगे पाटलांना कधीही माफ करणार नाही, असं वक्तव्य करत परिणय फुके यांनी करत त्यांच्यावर पलटवार केलाय. तर मुंबई उच्च न्यायालयाने डीजेवर बंदी घातली. कायद्याची जबाबदारी पोलिसांवर आणि जरांगे घसरतात मुख्यमंत्र्यांच्या आईवर… व्यक्तिगत द्वेषाने पछाडलेल्या जरांगेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या आईचा अपमान केलाय, असं म्हणत प्रवीण दरेकरांनीही संताप व्यक्त केलाय.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

