तब्येत खालावली तरी आत्मविश्वास कायम, मनोज जरांगे पाटील म्हणाले, ‘गैरसमज करून घेऊ नये’
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी १७ दिसव उपोषण केले. मात्र, आरक्षण मिळत नाही तोपर्यंत उचार घेणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर त्यांनी उपोषण मागे घेतले. पण आता त्यांची तब्येत खालावली आहे.
संभाजीनगर : 17 सप्टेंबर 2023 | मराठा आरक्षणासाठी तब्बल १७ दिवस उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सरबत घेऊन उपोषण संपवले. मात्र, १७ दिवस उपोषण केल्यामुळे त्यांची प्रकृती आता खालावली आहे. मनोज जरांगे पाटील यांना अंतरवाली सराटी येथून छत्रपती संभाजीनगरमधील गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. यावेळी त्यांच्या तपासण्या करण्यात आल्या. जरांगे पाटील यांची प्रकृती स्थिर असून त्यांना कफ, डीहायड्रेशनच आणि घशाचा त्रास त्रास झाला आहे. त्यांची शुगर 101 आहे. तर, रक्त आणि लघवीचे नमुने घेतले जाणार आहे. रिपोर्ट चांगले आले तर ठीक, नाही तर त्यांना ऍडमिट करून घेणार अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर विनोद चावरे यांनी दिली. तर, मनोज जरांगे पाटील यांनी थोडा थकवा जाणवत आहे असे सांगितले. समाजाचे आणि सरकारचे म्हणणे होते म्हणून तपासण्या करत आहे. मला काहीही झाले नाही. तपासण्या झाल्या की अंतरवाली येथे पुढील 40 दिवस उपोषण स्थळी बसणार आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तो पर्यंत अंतरवाली सोडणार नाही. कुणीही गैरसमज करून घेऊ नये, असे स्पष्ट केले.
काय तो विजय... सगळं कसं ओक्के! शहाजीबापू पाटलांनी सांगोल्यात राखला गड
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर

