Jarange Video : ‘…त्यांनी लाथ घालून हाकललं, अजितदादा अन् फडणवीसांचे आभार’, मुंडेंच्या राजीनाम्यावरून जरांगेंचा घणाघात
मनोज जरांगे पाटील यांनीही राजीनाम्यावर भाष्य केले आहे. 'सर्व चार्जशीट झाल्यावर राजीनामा दिला. त्या आधी द्यायला हवा होता. तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो असं आहे. राजकीय गुंड मित्र वाचवण्याचं काम केलं.', असं ते म्हणाले.
धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला आणि तो राजीनामा त्यांनी स्वीकारला. यानंतर राजकीय वर्तुळात सर्वांच्या प्रतिक्रिया येत असताना मनोज जरांगे पाटील यांनीही राजीनाम्यावर भाष्य केले आहे. ‘सर्व चार्जशीट झाल्यावर राजीनामा दिला. त्या आधी द्यायला हवा होता. तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो असं आहे. राजकीय गुंड मित्र वाचवण्याचं काम केलं. उशिरा का असेना पण अजितदादा आणि फडणवीस यांचे आभार मानले पाहिजे. त्यांनी लाथ घालून मुंडेंना हाकललं. आपण मागणी केली. त्यांनी नैतिकता म्हणा आणि संस्कार म्हणा… आम्ही काल मागणी केली आज राजीनामा दिला. हे माज मस्ती करून आपलेच लोकं पाताळात घालणार, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी दावा केला. तर जे झालं चांगलं झालं. अजित पवार आणि फडणवीस यांची नियत महत्त्वाची आहे. एवढी मोठी घटना होऊन मग्रुरी जशीच्या तशी आहे. एवढी मोठी घटना झाल्यावर त्यांना पश्चात्ताप होणार नाही. असं करून हे सर्वांच्या नजरेतून उतरणार आहे. एक दिवस यांची लंका डुबणार. यांची मग्रुरी आणि मस्तीखोरामुळे यांची लंका पाण्यात डुबणार. हे लयाला जाणार आणि पाताळात जाणार’, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर भाष्य केले आहे.
पुढे ते असेही म्हणाले, आता सरकारवरील नामुष्की ओढली, मी या या स्वरूपाचा असा राजीनामा देतो. तसं बोलत नाही तो. आताही तीच मग्रुरीची भाषा आहे. माझं दुखतंय मी राजीनामा देतोय, उपचारासाठी. पदाचा आणि उपचाराचा काय संबंध? बरं झालं. मुख्यमंत्री आणि अजितदादांना कळालं हा किती माजोरडा आहे. महाराष्ट्रातील मराठ्यांनाही कळायला हवं होतं. आता इथून पुढे मराठ्यांनी सावध राहून त्यांना मोठं करू नये. मराठ्यांनी हातचं राखून काम केलं पाहिजे. मराठे यांना आता घाबरू नये, असं आवाहन देखील मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना केलं आहे.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...

