Manoj Jarange : Dasara Melava : मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात, जरांगे पाटील उद्या काय बोलणार? महाराष्ट्राचं लक्ष

Manoj Jarange : Dasara Melava : मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात, जरांगे पाटील उद्या काय बोलणार? महाराष्ट्राचं लक्ष

| Updated on: Oct 19, 2026 | 2:13 PM

मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्याची श्रीक्षेत्र नारायणगडावर जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. लाखोंच्या उपस्थितीची शक्यता असल्याने पार्किंग, जेवण आणि पाण्याची सोय करण्यात आली आहे. सकाळी ११ वाजता जरांगे पाटील दाखल होऊन शेतकरी आणि महाराष्ट्रासमोरील संकटांवर भाष्य करणार आहेत, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

श्रीक्षेत्र नारायणगडावर मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. उद्या सकाळी ११ वाजता मनोज जरांगे पाटील नारायणगडावर दाखल होणार असून, ते मेळाव्याला संबोधित करतील. या मेळाव्यासाठी लाखोंच्या संख्येने लोक उपस्थित राहण्याचा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला आहे.

उपस्थितांसाठी नारायणगडाच्या चारही बाजूंनी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, लाखो लोकांसाठी जेवण, पाणी आणि निवासाची सोयही आयोजकांकडून करण्यात आली आहे. शेकडो एकर परिसरात साऊंड सिस्टिम्स आणि फ्लेक्स लावण्यात आले आहेत.

हा दसरा मेळावा पारंपरिक पद्धतीने होणार असला तरी, मनोज जरांगे पाटील उद्या काय बोलणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. विशेषतः शेतकरी संकटात असताना ते याबाबत काय भूमिका घेतात हे महत्त्वाचे ठरणार आहे. यापूर्वी जरांगे पाटलांवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या, तर शिंदेच्या शिवसेनेकडूनही मेळाव्याला विरोध दर्शवण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील त्यांच्या भाषणातून काही महत्त्वपूर्ण संदेश देतात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Published on: Oct 19, 2026 1:54 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us