Jarange vs Bhujbal : जसे संस्कार तशी भाषा… भुजबळांचा जरांगेंवर निशाणा, मला जरा 29 ला मोकळं होऊ द्या मग… जरांगेंचा पलटवार काय?
ओबीसी आरक्षणासाठी मुंबईत येण्यावर ठाम असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हंटलंय. बीडच्या मांजरसुंब्यातल्या मोर्चात पुरावे मिळूनही सरकार आरक्षण देत नसल्याचा आरोप करत त्यांनी टीकाही केली.
बीडमध्ये भव्य अशी इशारा सभा घेत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आरक्षणासाठी मुंबईत येण्याचा निश्चय केलाय. मराठा आणि कुणबी एकच आहेत हे सरकारने आधी मान्य करूनही आरक्षणास टाळाटाळ होते. त्यामुळे ५८ लाख सापडलेल्या नोंदींची तातडीने अंमलबजावणी करा म्हणून त्यांनी सरकारला इशारा दिलाय. २७ ऑगस्टला अंतरवाली सराटीतून मोर्चा निघणार आहे. तो २९ ऑगस्टच्या जवळपास मुंबईत पोहोचण्याचा अंदाज आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी बीड येथील एका सभेत जाहीर केले आहे की, ओबीसी आरक्षणासाठी मराठा समाज २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मोर्चा काढणार आहे. या मोर्चासाठी २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता अंतरवाली सराटी येथून प्रस्थान होणार आहे. जरांगे पाटील यांनी मुंबईच्या दिशेने निघणारा मोर्चा शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले आहे आणि कोणत्याही हिंसाचारापासून दूर राहण्याचा आग्रह धरला आहे. या मोर्चाचे राजकीय पडसादही उमटत आहेत. विरोधी पक्ष सरकारवर टीका करत असून, कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची मागणी करत आहेत. तर यावरून मात्र राजकीय आरोप प्रत्यारोपही सुरू झाले आहेत.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

