Ajit Pawar : छगन भुजबळांसमोरच अजित पवारांची उघड नाराजी? राष्ट्रवादीच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
मराठा आरक्षणाच्या जीआरवरून छगन भुजबळांनी तीव्र विरोध दर्शवला, तर अजित पवारांनी पक्षांतर्गत बैठकीत भुजबळांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. दरम्यान, मनोज जरांगे पाटलांनी अजित पवारांवर "साप पोसले" असल्याचा गंभीर आरोप करत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापवले आहे.
मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने काढलेल्या जीआरमुळे राजकीय वर्तुळात मोठे मतभेद दिसून येत आहेत. मंत्री छगन भुजबळ यांनी या जीआरला उघडपणे विरोध करत तो रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते, ओबीसी समाजाचे नुकसान होता कामा नये. भुजबळांच्या या आक्रमक भूमिकेवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी मुंबईतील एका बैठकीत जाहीर नाराजी व्यक्त केल्याचे सूत्रांकडून समजते.
पक्षाचे नेते विशिष्ट जातीय भूमिका घेतल्यास पक्षाची प्रतिमा मलिन होते आणि राजकीय नुकसान होते, असे अजित पवारांनी सुनावले. याच पार्श्वभूमीवर, मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. “अजित पवारांनी मराठ्यांविरोधात काम करणारे नेते पाळले आहेत. त्यांनी साप पोसले आहेत,” अशी जहरी टीका जरांगे पाटलांनी केली. त्यांनी दावा केला की, अजित पवारांचे नेते मराठा समाजाविरोधात कटकारस्थान करत आहेत. या राजकीय संघर्षात मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा बनला आहे.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

