अंतरावली सराटीत आंदोलकांची गर्दी वाढली, पोलिस बंदोबस्त तरी… पहा व्हिडीओ

अंतरावली सराटीत आंदोलकांची गर्दी वाढली, पोलिस बंदोबस्त तरी… पहा व्हिडीओ

| Updated on: Aug 30, 2026 | 12:36 PM

मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. अंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांची मोठी गर्दी झाल्याने वडीगोद्री येथील मार्गावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

जालन्यातील वडीगोद्री परिसरात मराठा आंदोलकांची अंतरवाली सराटीकडे होणारी गर्दी लक्षात घेता, पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस असून, त्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. वडीगोद्री मुख्य चौकातून अंतरवाली सराटीकडे जाणाऱ्या मार्गावर पोलीस कर्मचाऱ्यांचा कडेकोट बंदोबस्त सलग दुसऱ्या दिवशीही कायम आहे.

जिल्हा पोलीस दलातील कर्मचारी, पोलीस निरीक्षक, डीवायएसपी आणि अप्पर पोलीस अधीक्षक स्वतः या सर्व हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. वाहतूक पोलीसही या ठिकाणी तैनात आहेत. पोलिसांसाठी तात्पुरता पेंडॉल उभारण्यात आला असून, सर्व हालचालींवर बारकाईने नजर ठेवली जात आहे. काल काही आंदोलकांनी महामार्ग रोखून धरला होता, मात्र मध्यस्थीनंतर तो मागे घेण्यात आला होता. यामुळे, पुढील कोणत्याही अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस सतर्क आहेत.

Published on: Aug 30, 2026 12:36 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us