मराठा आरक्षणाबाबत विखे पाटील ॲक्शन मोडमध्ये, त्या अधिकाऱ्याला बजावली नोटीस

मराठा आरक्षणाबाबत विखे पाटील ॲक्शन मोडमध्ये, त्या अधिकाऱ्याला बजावली नोटीस

| Updated on: May 30, 2026 | 1:09 PM

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे रखरखत्या उन्हात आमरण उपोषणासाठी बसले आहेत. यावेळी राज्याचे महसूल मंत्री तथा मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील जरांगेंना भेटले, तसेच अनेक मागण्यांवर सहमत झाल्याचं सांगितलं. दरम्यान याच प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे.

राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या शिष्टमंडळाने अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्तालयात आढावा बैठक घेऊन अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीत मराठा-कुणबी प्रमाणपत्र वाटप प्रक्रियेचा आढावा घेण्यात आला. 58 लाख कुणबी नोंदी उपलब्ध असतानाही त्या प्रमाणात प्रमाणपत्रांचे वितरण का झाले नाही, असा प्रश्न जरांगे पाटील यांनी उपस्थित केला. तसेच वाटप प्रक्रिया थांबवण्याचे आदेश कोणी दिले, याचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. दरम्यान, आजच एका बड्या अधिकाऱ्याला नोटीस बजावण्यात आली आहे. विखे पाटलांनी संबंधित प्रकरणाची चौकशी केली, यानंतर प्रमाणपत्र वाटप करण्यात दिरंगाई केल्याचं दिसून आलं. याप्रकरणी संभाजीनगरातील अधिकाऱ्याला नोटीस बजावण्यात आली आहे.

Published on: May 30, 2026 1:09 PM
Follow Us