Santosh Deshmukh Case : संतोष देशमुखांच्या हत्येला 4 महीने पूर्ण; ‘आमच्या राजाला न्याय पाहिजे’, मस्साजोगच्या ग्रामस्थांनी लावले बॅनर
Massajog News : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 4 महीने पूर्ण झाले आहेत. त्यांच्या मारेकऱ्यांना फाशी व्हावी, संतोष देशमुख यांना न्याय मिळवा यासाठी मस्साजोग येथील ग्रामस्थांनी ठिकठिकाणी बॅनर लावलेले आहेत.
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 4 महीने पूर्ण झाले आहेत. अद्यापही सर्व आरोपी पोलिसांना सापडलेले नाही. तर जे आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत त्यांना फाशीची शिक्षा व्हावी आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी मस्साजोगचे ग्रामस्थ देशमुख कुटुंबासोबत सातत्याने आंदोलन मोर्चे करून लढा देत आहेत.
आज या घटनेला 4 महीने पूर्ण झाले आहेत. त्याच अनुषंगाने मस्साजोगच्या ग्रामस्थानी ज्या ठिकाणी पहिल्यांदा आंदोलन करत न्यायाची मागणी केली होती त्याच ठिकाणी आज बॅनर लाऊन संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा करण्याची मागणी केली आहे. ‘आमच्या राजाला न्याय पाहिजे’ असं या बॅनरवर लिहिलं आहे. तसंच संतोष देशमुख यांच्याकडून मस्साजोगच्या ग्रामस्थांना काल्पनिक पत्र लिहिलेला एक बॅनर देखील लावण्यात आलेला आहे. अतिशय भावनिक पत्र या बॅनरवर लिहिलं आहे.
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया

