म्हाडाच्या घरासाठी अर्ज करताय? सावधान… सर्वसामान्यांची होतेय फसवणूक, भाजप मंत्र्यांकडून तक्रार दाखल
म्हाडा सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करत असतं. कमी किमतीत घर खरेदी करण्याची सुवर्णसंधी म्हाडा सर्वसामान्यांना देते. यंदा मुंबईतील मालाड, पवई, विक्रोळी, गोरेगाव आणि वडाळा यांसारख्या ठिकाणी 2,030 घरांसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू झाली आहे. जर म्हाडाच्या घरासाठी तुम्ही अर्ज करत असाल तर हा व्हिडीओ बघा
म्हाडाच्या बोगस वेबसाईटवरून सर्वसामान्यांची फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. म्हाडाची बोगस वेबसाईट तयार करणाऱ्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असल्याची माहिती मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे. बोगस वेबसाईटवरून सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होत असल्याने म्हाडासाठी अर्ज करणाऱ्या नागरिकांनी म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवरूनच आपले अर्ज भरावे, असे आवाहन देखील अतुल सावे यांनी सर्वसामान्य नागरिकांना केले आहे. यासंदर्भात बोलताना अतुल सावे म्हणाले, ज्यांनी म्हाडाची बोगस साईट तयार केलेली त्यांच्या विरोधात आम्ही तक्रार दिलेली आहे. आम्ही सायबरमध्ये देखील यासंदर्भात तक्रार केली आहे. ज्यांनी बोगस वेबसाईट बनवली आहे त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल, असे अतुल सावे म्हणाले तर नागरिकांना आमची विनंती आहे की, त्यांनी म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवरच अर्ज भरावे, असे आवाहनदेखील अतुल सावे यांनी सर्वसामान्यांना केले आहे.
पुण्यात धो धो धो...मान्सूनपूर्व पावसाने झोडपलं; सगळीकडे बरसल्या सरी!
petrol shortage | थेट कोयता, तलवार घेऊन... पेट्रेल पंपावर मोठा राडा...
राज्यात SIR कसे राबवले जाणार, कोणती कागदपत्रे द्यायची? निवडणूक आयोग...
कॉकरोच जनता पार्टीच्या अध्यक्षाला जीवे मारण्याची धमकी, देशभरात मोठी..
