Ladki Bahin Yojana Video : ‘लाडक्या बहिणीं’ना 2100 रूपये मिळणार की नाही? विरोधकांच्या प्रश्नावर आदिती तटकरेंनी थेट सांगितलं…
सत्तेत आल्यानंतर आम्ही लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये देऊ, या वायद्यावरून विरोधकांनी महायुती सरकारलाच घेरलेलं होतं. पैसे कधीपासून देणार याबाबत देखील सरकारतर्फे स्पष्ट उत्तर आलेलं नाहीये. तर तुम्ही वायद्यप्रमाणे 2100 देणार आहात की नाही या प्रश्नावर मंत्री आदिती तटकरे यांनी चेंडू मुख्यमंत्र्यांकडे आता टाकलेला आहे.
महायुतीतील विजयानंतर लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी दरमहा 2100 रुपये देऊ म्हणणारे नेते आता मात्र 2100 देणार की नाही यावर सत्तेतील प्रमुख निर्णय घेतील म्हणून सांगतायत. दोन दिवसांपूर्वी जाहीरनामा पाच वर्षांसाठी असतो असं सरकारी भाषेतलं उत्तर तटकरे यांनी दिलं होतं. त्यानंतर सभागृहात सरकार लाडक्या बहिणींना केलेल्या वायद्यानुसार 2100 देणार आहे की नाही या स्वरूपात विचारलेल्या प्रश्नावरही मंत्री आदिती तटकरे यांनी सारी पूर्वपीठिका सांगत मूळ उत्तर दिलंच नाही. अर्थमंत्री अजित पवार आणि मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आकडेवारी बघा..
सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. तेव्हा साधारण अडीच कोटी महिलांसाठी वर्षाला 47 हजार कोटी लागतील असं सांगण्यात आलं. या वर्षाच्या बजेटमध्ये सरकारने 2 कोटी 53 लाख महिला लाडक्या असल्याचं सांगितले. पण त्यांच्यासाठी वर्षाची तरतूद फक्त 36 हजार कोटी इतकी केली आहे. म्हणजे गेल्यावर्षी सरकारने सांगितलेल्या हिशेबात यांदा 10 हजार कोटी इतकी कमी तरतूद झाली आहे. त्यात अजून रंजक गोष्ट म्हणजे आमच्या सरकारने निवडणुकीनंतर लाडक्या बहिणींची संख्या वाढवल्याची माहिती तटकरे सभागृहात देत आहेत. त्याच सभागृहात अजित पवार महिलांची संख्या वाढवूनही त्यांच्यासाठीची तरतूद 10 हजार कोटींनी कमी करतात. हे गणित अजूनही उलगडलेलं नाही. तर तटकरे सांगतात की फेब्रुवारी 2024 मध्ये आम्ही 2 कोटी 47 लाख महिलांना लाडक्या बहिणींचे पैसे दिले. अर्थसंकल्पातील आकडे सांगतात की यांदाच्या वर्षात त्यांची तरतूद ही 2 कोटी 53 लाख महिलांसाठी आहे.

कोरटकर थांबलेल्या हॉटेलांना नोटिस दिली; पोलिसांची कोर्टात माहिती

कराड-मुंडेंच्या सांगण्यावरून देशमुखांची हत्या,ठाकरेंच्या नेत्याचा आरोप

बंगरुळू हत्या प्रकरण : आरोपीच्या वडिलांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

देशमुखांच्या हत्येचं शूटींग ज्या फोनमधून केल, त्याचा तपासणी अहवाल समोर
