AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

'भुजबळ ज्येष्ठ पण त्यांचे चिल्लर चाळे...', मनोज जरांगे पाटील यांनी विषयच संपवला

‘भुजबळ ज्येष्ठ पण त्यांचे चिल्लर चाळे…’, मनोज जरांगे पाटील यांनी विषयच संपवला

| Updated on: Oct 12, 2023 | 11:12 PM
Share

१४ तारखेला होणारी अंतरवाली सराठी येथे होणारी सभा मराठा समाजाच्या दृष्टीने ऐतिहासिक होणार आहे. ही सभा शांततेत पार पडणार आहे. मराठा समाजाला आरक्षण भेटणारच असा विश्वास व्यक्त करतानाच मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री भुजबळ यांच्यावरही टीका केलीय.

जालना : 12 ऑक्टोबर 2023 | मनोज जरांगे पाटील यांची 14 तारखेला अंतरवाली सराठी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता सभा होणार आहे. या सभेसाठी शंभर एकर जमीन समतल करण्यात आली आहे. यावरून मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यांची सभा १०० एकर जमिनीवर होणार आहे. ही सभा घेण्यासाठी किमान सात ते आठ कोटी रुपये लागतील. आपण एवढं काम करतो. पण, एका कार्यक्रमासाठी सात, आठ लाख रुपये जमवू शकत नाही, असा टोला त्यांनी लगावला होता. त्याला मनोज जरांगे पाटील यांनी प्रतुत्तर दिलंय. जमीन कार्यक्रमासाठी घेतली विकत घेतली नाही. घटनेच्या पदावर बसून असं वक्तव्य कसं करतात. गोदा पट्ट्यातील लोकांनी पैसे जमा केले आहेत. पोकलण वैगरे फुकट दिले आहेत. भुजबळांना आम्ही ज्येष्ठ मानत होतो. मराठ्यांनी त्यांना मोठं केलं पण ते आता चिल्लर माणसासारखं वागतात. छगन भुजबळ चिल्लर चाळे सुरू करायला लागले, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली.

Published on: Oct 12, 2023 11:12 PM