जिथे जन्म झाला आज त्याच बंगल्यात 55 वर्षांनी प्रवेश! मंत्री शंभूराज देसाई आईला मिठी मारून ढसाढसा रडले
स्व.बाळासाहेब देसाई यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना मेघदूत बंगला मिळाला होता आणि याच बंगल्यात आज मंत्री शंभूराज देसाई यांनी गृहप्रवेश केला.
स्व.बाळासाहेब देसाई यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना मेघदूत बंगला मिळाला होता आणि याच बंगल्यात मंत्री शंभूराज देसाई यांचा जन्म झाला. त्याच मेघदूत बंगल्यात आज तब्बल 55 वर्षांनी मंत्री शंभूराज देसाई यांनी गृहप्रवेश केला. यावेळी त्यांना आणि त्यांच्या मातोश्रींना अश्रू अनावर झालेले बघायला मिळाले.
मेघदूत बंगल्यावर शंभूराज देसाई यांचं बालपण गेलं आहे. आजोबा स्व. बाळासाहेब देसाई यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना मेघदूत बंगला मिळाला होता. या दरम्यान मंत्री शंभूराज देसाई यांचा जन्म झाला होता. त्यामुळे पहिली पाच वर्ष शंभूराज देसाई यांनी बालपण घालवलं. त्यानंतर आज तब्बल ५५ वर्षानंतर शंभूराज देसाई आपल्या मातोश्रीसह गृहप्रवेशा दरम्यान आले असताना त्यांचे डोळे पानावले. तर संपूर्ण देसाई कुटुंब भावूक झाले.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

