Mira Bhayandar MNS Morcha :अखेर मनसेचा मोर्चा मीरा रोड स्थानकाच्या दिशेने निघाला
Mira Bhayandar MNS Morcha LIVE : आधी परवानगी नाकारण्यात आलेला मनसेचा मोर्चा सुरू झाला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेने (मनसे) ला मीरा-भाईंदरमध्ये मोर्चा काढण्यास सुरुवातीला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र, आता मुंबईसह बोरीवली, कांदिवली आणि आसपासच्या परिसरातील मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मीरा-भाईंदरकडे निघाले आहेत. मनसे नेते अभिजीत पानसे यांच्या नेतृत्वाखाली मीरा रोडवर हा मोर्चा सुरू झाला आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मनसे कार्यकर्त्यांना एका हॉलमध्ये ठेवले होते, परंतु या कार्यकर्त्यांनी पोलिसांचे सुरक्षा कवच तोडून बाहेर पडत मोर्चासाठी पुन्हा एकवटण्यास सुरुवात केली आहे. या घटनेमुळे मीरा-भाईंदर परिसरातील राजकीय वातावरण तणावपूर्ण बनले आहे. या मोर्चात केवळ मनसे कार्यकर्तेच नाही तर सामान्य मराठी माणूस देखील मोठ्या संख्येने सहभागी झालेला आहे. त्यामुळे मोर्चाच्या ठिकाणी मोठी गर्दी झालेली बघायला मिळत आहे.

